रस्त्याच्या कडेला वाहनांची संख्या वाढली

By Admin | Updated: November 24, 2014 22:56 IST2014-11-24T22:56:46+5:302014-11-24T22:56:46+5:30

अहेरी-महागाव-चंद्रपूर या प्रमुख मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच दुचाकी वाहनांची वर्दळ असते. याच मार्गाने नागरिक दुर्गम गावाकडे जातात. मात्र याच मार्गावर राज्य परिवहन

The number of vehicles on the road side increased | रस्त्याच्या कडेला वाहनांची संख्या वाढली

रस्त्याच्या कडेला वाहनांची संख्या वाढली

अहेरी : अहेरी-महागाव-चंद्रपूर या प्रमुख मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच दुचाकी वाहनांची वर्दळ असते. याच मार्गाने नागरिक दुर्गम गावाकडे जातात. मात्र याच मार्गावर राज्य परिवहन महामंडळाचे आगार, पेट्रोलपंप, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यामुळे सदर मार्गावर चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र याच मार्गावर एसटी बसस्थानकापासून कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकापर्यंत नेहमी माल वाहतूक करणारे वाहने उभ्या ठेवल्या जातात. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या संदर्भात अहेरीचे आगार व्यवस्थापक रोकडे यांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र या संदर्भात कारवाई करण्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
रस्त्याच्या दोनही कडेला अनेक वाहने उभ्या केल्या जातात. यामुळे महामंडळाच्या आगारातून सुटणाऱ्या व परत येणाऱ्या प्रवाशी बसेसना अडचण निर्र्माण होते. याच मार्गाने अनेकदा रूग्णवाहिका रूग्णांची ने-आण करतात. मात्र वाहनांच्या गर्दीमुळे रूग्णवाहिका संबंधीत शासकीय रूग्णालयापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो. याच मार्गाने अनेक दुचाकी व चारचाकी वाहने धावत असतात. रस्त्याच्या दोन्ही कडेला उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन महामंडळाची बस वाहतूक अनेकदा प्रभावित असते. परिणामी अपघाताची शक्यता या मार्गावर बळावली आहे. त्यामुळे पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवून सदर समस्या मार्गी लावावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The number of vehicles on the road side increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.