शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:52 PM

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या हत्ती कॅम्पमधील लहान-मोठे सात हत्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली ....

ठळक मुद्देस्थानांतराच्या हालचाली मंदावल्या : पालकमंत्र्यांच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना सूचना

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या हत्ती कॅम्पमधील लहान-मोठे सात हत्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असल्याचे कमलापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी लांडगे यांनी सांगितले. दरम्यान येथील सर्व हत्ती नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पात हलवू नये, अशी सूचना पालकमंत्री तथा वन राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना केली. त्यामुळे हत्ती हलविण्याच्या हालचाली मंदावल्या आहेत.तब्बल ५५ वर्षांपासून कमलापूरला असलेल्या हत्तींचे पेंच प्रकल्पात स्थानांतर करण्याचा आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी काढला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जनसामन्यांत असंतोष वाढला होता. लोकमतने याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना हत्ती कॅम्प न हलविण्यामागील कारणे सांगितली पर्यटनाच्या दृष्टीने या जिल्ह्याची ती गरज कशी आहे आणि त्याच्याशी जनभावना कशा जुळल्या आहेत हेसुद्धा त्यांना समजावून सांगितले. त्यामुळे सातपैकी काही हत्ती प्रशिक्षणासाठी पेंचमध्ये नेण्यावर सहमती झाली. हत्तींना योग्य प्रशिक्षण दिले नाही तर ते एखाद्या वेळी उधळून पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे कारण वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र नेमके किती हत्ती पेंचमध्ये नेणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. हत्तींना प्रशिक्षित करून पुन्हा कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये आणावे अशी मागणी कमलापूर व जिल्हाभरातील नागरिकांची मागणी आहे.वाहनांची सोय करणे गरजेचेकमलापूरच्या हत्ती कॅम्पची माहिती अगदी अलिकडे लोकांना समजत आहे. त्यामुळे येथील हत्ती कॅम्पचे आकर्षण वन्यजीवप्रेमी व पर्यटकांना आहे. मात्र हत्ती कॅम्पला पोहोचण्यासाठी थोडी कसरत करावी लागते. आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर रेपनपल्लीपर्यंत खासगी वाहनासह एसटी बसनेही पोहोचता येते. मात्र तेथून ९ किलोमीटर आत जाण्यासाठी एसटी बस नाही. तिथे खासगी वाहनानेच जावे लागते. रेपनपल्लीवरून स्पेशल आॅटोरिक्षाही करता येतो. तिथे उपलब्ध न झाल्यास ३ किलोमीटरवर असलेल्या कमलापूरला आॅटोने जाऊन तेथून हत्ती कॅम्पसाठी दुसरा आॅटो करावा लागतो. पुढे पर्यटकांचा ओघ वाढल्यास रेपनपल्लीवरून थेट हत्ती कॅम्पला जाण्यासाठी विशेष वाहनाची सोय करावी लागणार आहे.८० वर्षाची हत्तीण१९६२ साली कमलापूरला पहिली हत्तीण आणण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांनी आलापल्लीवरून एक हत्ती आणला. आता त्यांचे कुटुंब चांगले विस्तारून ७ जणांचे झाले आहे. या कुटुंबातील पहिली हत्तीण आता जवळपास ८० वर्षांची झाली आहे. या वयोवृद्ध हत्तीणीपासून तर दिड वर्षाच्या छोट्या हत्तीपर्यंत सर्व वयोगटाचे हत्ती कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये पहायला मिळतात.