सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:05+5:302021-03-18T04:37:05+5:30
आजचे युग इंटरनेटचे असल्यामुळे देवाण-घेवाण नोकरी मिळणे कमी होत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे आपल्या काम करण्याची व जगण्याची पद्धत बदलून ...

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली
आजचे युग इंटरनेटचे असल्यामुळे देवाण-घेवाण नोकरी मिळणे कमी होत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे आपल्या काम करण्याची व जगण्याची पद्धत बदलून जात आहे. व्यवसाय वातावरणही बदलत जात आहे. काळाबरोबर अनेक प्रकारचे नोकऱ्यांची संख्येत घट होत आहे. स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्यामुळे येथील उच्चशिक्षित तसेच सुशिक्षित बेरोजगारांचे परराज्यामध्ये स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सिरोंचा तालुका हा दोन्ही राज्यांना जोडला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यांना वाईट सवयी, वाईट व्यसने तसेच चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे येथे बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगारांकडून होत आहे.