मेडाराम जत्रेतील भाविकांचा आकडा एक कोटीवर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:26+5:30

अहेरी उपविभागाच्या सिरोंचा व भामरागड परिसरातील लोकांचा तेलंगणातील लोकांशी रोटीबेटीचा व्यवहार आहे. त्यामुळे समक्का-सारक्का या देवीवर या भागातील मोठी श्रध्दा आहे. गेल्या ९०० वर्षाची परंपरा असलेल्या तेलंगणातील मेडाराम येथे दर दोन वर्षानी समक्का-सारक्का जत्रा भरत असते. सिरोंचा शहरापासून ११० किमी अंतरावर असल्याने मेडाराम येथे जाण्यासाठी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने येथून दोन्ही महामंडळाच्या बसगाड्या आवागमण करीत आहेत.

The number of devotees in Madaram Jatra will rise to one crore | मेडाराम जत्रेतील भाविकांचा आकडा एक कोटीवर जाणार

मेडाराम जत्रेतील भाविकांचा आकडा एक कोटीवर जाणार

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ५० लाखांवर भाविकांची हजेरी : ९०० वर्षापासून दर दोन वर्षांनी भरते जत्रा

रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडाराम/भामरागड : भाविकांच्या गर्दीचा उच्चांक गाठणारी तेलंगणातील सर्वात मोठी जत्रा मेडाराम येथे भरली आहे. गेल्या तीन दिवसांत येथे या यात्रेत ५० लाख भाविकांनी हजेरी लावून समक्का व सारक्का देवीचे दर्शन घेतले. ८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत महाराष्टÑ व छत्तीसगडसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडीसा, झारखंड या राज्यातील भाविक येथे मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. सदर जत्रेतील भाविकांचा आकडा जत्रा संपेपर्यंत एक ते दिड कोटीच्या वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहेरी उपविभागाच्या सिरोंचा व भामरागड परिसरातील लोकांचा तेलंगणातील लोकांशी रोटीबेटीचा व्यवहार आहे. त्यामुळे समक्का-सारक्का या देवीवर या भागातील मोठी श्रध्दा आहे. गेल्या ९०० वर्षाची परंपरा असलेल्या तेलंगणातील मेडाराम येथे दर दोन वर्षानी समक्का-सारक्का जत्रा भरत असते. सिरोंचा शहरापासून ११० किमी अंतरावर असल्याने मेडाराम येथे जाण्यासाठी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने येथून दोन्ही महामंडळाच्या बसगाड्या आवागमण करीत आहेत. त्यामुळे मेडारामच्या जत्रेला जाणाºया भाविकांची संख्या वाढली आहे. गुरूवारी सदर जत्रेत सारलम्म देवी, पगिडीध्देराजा, गोविंदाराजाचे दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगमन झाले आहे. आदिवासी पुजाऱ्यांनी येथे पारंपारिक रितीरिवाजानुसार पूजा-अर्चा केली. शुक्रवारी समक्का देवीच्या आगमनाची मुख्य पूजा करण्यात आली. बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. शनिवारी देवी देवतांचा पुन्हा वन प्रवेश होणार आहे.
सदर जत्रेच्या ठिकाणी आर्य, वैश्य, ब्राह्मणासह सर्व जाती धर्माचे लोक गुळ, हळद, कुंकू, नारळ देऊन नवस फेडतात. तेलंगणा राज्याच्या मुलगू जिल्ह्यातील ताडववाई मंडल परिसरात घनदाट बांबूच्या जंगलात मेडाराम हे आदिवासी गाव वसले आहे. येथे कुठल्याही प्रकारचे मंदिर व मूर्ती नाही. तरीसुध्दा येथे जत्रेला भाविकांची मोठी गर्दी होत असते.

पुणे जिल्ह्यातील गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म
मेडाराम येथील जत्रेसाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील गर्भवती महिलेने गुरूवारी येथे एका बाळाला जन्म दिला. प्रसुतीकळा येऊ लागल्याने तिला मेडाराम येथील शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. सकाळी ११.३८ वाजता तिने एका बाळाला जन्म दिला. पुणे जिल्ह्याच्या शनीनगर येथील शिवानी चव्हाण ही गर्भवती महिला समक्काच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंबासोबत मंगळवारी मेडाराम येथे दाखल झाली होती. दरम्यान तिला प्रसुतीकळा होऊ लागल्याने तिला मेडाराम येथील शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. येथे तिची प्रसुती झाली. बाळ व आई सुखरूप असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
 

Web Title: The number of devotees in Madaram Jatra will rise to one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.