कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST2021-03-18T05:00:00+5:302021-03-18T05:00:23+5:30
बुधवारला नवीन ३४ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ९९६६ झाली आहे. हा आकडा १० हजारांचा पल्ला गाठण्यासाठी आता केवळ ३४ रुग्ण बाकी आहेत. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बुधवारी केवळ ७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून ती आता २६७ वर गेली आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या उंबरठ्यावर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिराेली जिल्ह्यात महिनाभरापासून पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ली आहे. १० महिन्यात प्रथमच दिवसाला एकही कोरोनारुग्ण आढळला नसल्याची स्थिती महिनाभरापूर्वी होती. पण आता हा आकडा पुन्हा प्रतिदिन ३० रुग्णापेक्षा पुढे गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.
बुधवारला नवीन ३४ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ९९६६ झाली आहे. हा आकडा १० हजारांचा पल्ला गाठण्यासाठी आता केवळ ३४ रुग्ण बाकी आहेत. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बुधवारी केवळ ७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असून ती आता २६७ वर गेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित ९९६६ पैकी ९५९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या २६७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जण रुग्णालयात तर काही घरीच विलगीकरणात आहेत. आतापर्यंत एकुण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के, तर क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण २.६८ टक्के आहे.
नवीन ३४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९, अहेरी तालुक्यातील १, आरमोरी तालुक्यातील ६, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, कोरची तालुक्यातील ३, वडसा तालुक्यातील ३, जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ७ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील ६, तर वडसा मधील एका जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये कॅम्प एरिया १, मुरखळा १, रामपुरी वार्ड १, जामामजीद १, शाहु नगर २, स्थानिक १, बजरंग नगर १, रेड्डी गोडाऊन चौक ३, रिलायंस पेट्रोल पंप १, नवेगाव १, कनेरी १, महिला कॉलेज जवळ १,नवेगाव ग्रामसेवक कॉलनी १, इग्लीश स्कुल जवळ आनंद नगर २, आदिवासी ऑफीस आयटीआय डीपी जवळ १, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड १, आमगांव २, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान नगर १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, वैरागड ३, वनकी १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प १, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बोदलदंड ३ जणांचा समावेश आहे.
महिनाभरात एकही मृत्यू नाही
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असली तरी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. ही थोडी दिलासा देणारी बाब ठरली आहे. आतापर्यंत १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. अर्थात त्यातील बहुतांश रुग्ण इतरही आजारांनी ग्रस्त होते. पण गेल्या महिनाभरात कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. सध्या मृत्यूदर १.८ टक्के एवढा आहे.