आता उरले केवळ १७ काेराेना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:42 IST2021-09-12T04:42:11+5:302021-09-12T04:42:11+5:30

शनिवारी जिल्ह्यात ३५८ कोरोना तपासण्यांपैकी १ नवीन कोरोनाबाधित आढळून आला. ८ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण बाधितांची संख्या ३० ...

Now there are only 17 patients left | आता उरले केवळ १७ काेराेना रुग्ण

आता उरले केवळ १७ काेराेना रुग्ण

शनिवारी जिल्ह्यात ३५८ कोरोना तपासण्यांपैकी १ नवीन कोरोनाबाधित

आढळून आला. ८ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण बाधितांची संख्या ३० हजार ७४३ झाली आहे. त्यापैकी २९ हजार ९८० जणांनी काेराेनावर मात केली आहे. आत्तापर्यंत एकूण ७४६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५२ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.०६ टक्के तर मृत्यू दर २.४३ टक्के झाला आहे. नवीन एक रुग्ण धानोरा तालुक्यातील आहे. कोरोनामुक्त झालेल्या ८

रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २, अहेरी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.

’’’’’’’’’’’’’’

बाॅक्स

हे तालुके झाले काेराेनामुक्त

अहेरी, आरमाेरी, चामाेर्शी, एटापल्ली, कुरखेडा, काेरची, सिराेंचा, देसाईगंज हे आठ तालुके शनिवारी काेराेनामुक्त झाले. तर भामरागड तालुक्यात २, धानाेरा १, गडचिराेली ६ व मुलचेरा तालुक्यात ८ रुग्ण उपचार घेत आहेत. जे तालुके काेराेनामुक्त झाले आहेत. ते तसेच ठेवण्यासाठी नागरिकांना याेग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Now there are only 17 patients left