विदर्भात काजू लागवडीसाठी पोषक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:36+5:30

विदर्भात काजूचे उत्पादन घेणे शक्य आहे काय, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या शास्त्रज्ञांनी गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील रोपवाटिकेला सोमवारी भेट देऊन या ठिकाणी असलेल्या काजूच्या झाडांची पाहणी केली.

Nourishing environment for cashew cultivation in Vidarbha | विदर्भात काजू लागवडीसाठी पोषक वातावरण

विदर्भात काजू लागवडीसाठी पोषक वातावरण

Next
ठळक मुद्देअभ्यास गटाकडून पाहणी : वाकडी रोपवाटिकेतील काजू लागवडीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाकडी येथील रोपवाटिकेत जवळपास ३५० काजूची झाडे आहेत. या झाडांचे वयोमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे. सदर झाडे चांगले उत्पन्न देत आहेत. त्यामुळेच काजू अभ्यास गटाने वाकडी येथील रोपवाटिकेला भेट देऊन काजूच्या झाडांची पाहणी केली. ही काजूची झाडे अतिशय चांगल्या स्थितीत असल्याने विदर्भात काजू लागवडीसाठी पोषक वातावरण व जमीन आहे, असा निष्कर्ष अभ्यास गटाने काढला.
विदर्भात काजूचे उत्पादन घेणे शक्य आहे काय, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या शास्त्रज्ञांनी गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील रोपवाटिकेला सोमवारी भेट देऊन या ठिकाणी असलेल्या काजूच्या झाडांची पाहणी केली.
यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ.प्रकाश नागरे, फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शशांक भराड, सोनापूरचे सहयोगी प्रा.डॉ.शालिनी बडगे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.संदीप कºहाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, सहायक गीता कुळमेथे आदी उपस्थित होते. वाकडी येथील शासकीय रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वात मोठी रोपवाटिका आहे.
या रोपवाटिकेत आंबा, लिंबू, चिकू आदी शेकडो झाडे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या रोपवाटिकेतील झाडे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात. या रोपांचा लाभ घेऊन फळबागा फुलवाव्या, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले.

फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी फळ लागवडीकडे वळावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. विदर्भात पश्चिम महाराष्टÑाच्या तुलनेत फळबाग लागवडीचे क्षेत्र अतिशय कमी आहे. शेतकºयांना प्रोत्साहन दिल्यास फळ लागवडीखालील क्षेत्र वाढू शकते. त्यामुळे शासनाने अभ्यासगट तयार करून विदर्भातील काजू बागांचा अभ्यास करण्यास सुरूवात केली आहे.

Web Title: Nourishing environment for cashew cultivation in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.