नवीन वसाहतीत ना पाणी, ना रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:00 AM2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:32+5:30

नगर विकास विभागाच्या नियमानुसार प्लाॅट मालकाने सर्वप्रथम रस्ता, वीज, नाली या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एनएचे प्लाॅट असलेल्या ठिकाणी या सुविधा पुरविल्या जातात. मात्र एनएचे प्लाॅट महाग असल्याने काही नागरिक हे प्लाॅट खरेदी न करता शेतजमीन  खरेदी करून त्यावर घर बांधतात. शेतजमीनमालक त्या जागेवर रस्ता, वीज, नाली यासारख्या सुविधा उपलब्ध करत नाही. त्यामुळे घर बांधून काही वर्ष झाल्यानंतर नागरिक नगर परिषदेकडे रस्ता, नाली व पाण्याच्या पाईपलाईनसाठी तगादा लावतात. 

No water, no roads in the new colony! | नवीन वसाहतीत ना पाणी, ना रस्ते !

नवीन वसाहतीत ना पाणी, ना रस्ते !

googlenewsNext
ठळक मुद्देगडचिराेलीतील स्थिती : मागील पाच वर्षात शहराच्या विस्ताराचा वेग वाढला

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहराचा विस्तार वाढत असताना नवीन वस्त्यांचीही संख्या वाढत आहे. मात्र या वस्त्यांमध्ये रस्ते, नाली व पाणी या मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे दिसून येते. स्थानिक लोक त्यासाठी प्रभागाच्या नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत.
नगर विकास विभागाच्या नियमानुसार प्लाॅट मालकाने सर्वप्रथम रस्ता, वीज, नाली या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एनएचे प्लाॅट असलेल्या ठिकाणी या सुविधा पुरविल्या जातात. मात्र एनएचे प्लाॅट महाग असल्याने काही नागरिक हे प्लाॅट खरेदी न करता शेतजमीन  खरेदी करून त्यावर घर बांधतात. शेतजमीनमालक त्या जागेवर रस्ता, वीज, नाली यासारख्या सुविधा उपलब्ध करत नाही. त्यामुळे घर बांधून काही वर्ष झाल्यानंतर नागरिक नगर परिषदेकडे रस्ता, नाली व पाण्याच्या पाईपलाईनसाठी तगादा लावतात. 
इंदिरानगर, गाेकूलनगर, विवेकानंदनगर आदी ठिकाणी अनेकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. या घरांवर नगर परिषदेमार्फत घरटॅक्स आकारला जातेा. त्यामुळे नगर परिषदेने रस्ता, नाली, पाणी या मूलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे. नगर परिषद घरटॅक्स आकारत असल्याने ही मागणी रास्त सुद्धा आहे. मात्र शहराच्या विस्ताराचा वेग लक्षात घेतला तर नवीन वस्त्यांमध्ये तत्काळ मूलभूत सुविधा पुरविणे शक्य हाेत नाही. काही वस्त्यांमध्ये घरे बांधून अनेक वर्ष झाली. मात्र पक्के रस्ते, पाणी व नाल्या नाहीत.

मुरूम टाकून केली जाते तात्पुरती साेय 
पावसाळ्यात नगर परिषदेमार्फत शहरात जवळपास ४०० ते ५०० ब्रास मुरूम टाकले जाते. ज्या नागरिकांना जाण्यासाठी रस्ते नाहीत किंवा एखाद्या ठिकाणी चिखल निर्माण झाले आहे, अशा ठिकाणी मुरूम टाकून तात्पुरता मार्ग उपलब्ध करून दिला जाते. त्यामुळे ये-जा करण्याची थाेडीफार साेय झाली आहे. अनेक वस्त्यांमध्ये नळाची पाईपलाईन नव्हती. मात्र मागील सहा महिन्यांपासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामात शहराचा बराच भाग व्यापला आहे. पाईपलाईन जरी वाढविण्यात आली असली तरी पाणी टाक्यांची क्षमता कमी असल्याने पाणी पुरणार काय, असा प्रश्न आहे. 

घराचे बांधकाम हाेताच नगर परिषदेमार्फत घरटॅक्स आकारला जातेा. त्यामुळे नागरिकांना रस्ता, नाली, वीज, पाणी, आराेग्य या मूलभूत सुविधा पुरविणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. मागील तीन महिन्यांपासून गाेकुलनगरातील माता मंदिर परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसरातील नाल्या गाळाने तुंबल्या आहेत.      
- सुरेंद्र खरवडे, नागरिक

झाशी राणीनगरात घराचे बांधकाम हाेऊन चार वर्षांचा कालावधी झाला. त्यानंतर यावर्षी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र नाली बांधकाम झाले नाही. नालीचे बांधकाम हाेणे आवश्यक आहे. यासाठी नगर परिषदेने निधी मंजूर करावा. चार महिन्यांपूर्वी नळाची पाईपलाईन टाकली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सुटली आहे. 
- शुभांगी उमाजी भांडेकर, नागरिक

नवीन वस्त्यांमध्ये रस्ते बांधकामाला नगर परिषद नेहमीच प्राधान्य देते. काही  रस्ते व नाल्यांच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. बहुतांश वाॅर्डांपर्यंत पाणीपाईपलाईन टाकण्यात आली आहे. पासाळ्यात चिखलाची समस्या निर्माण हाेऊ नये, यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार मुरूम टाकून दिला जातो.      
- संजीव ओहाेळ, मुख्याधिकारी, 
नगर परिषद, गडचिराेली

 

Web Title: No water, no roads in the new colony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.