मुख्याधिकाऱ्यांना भेटले : अशासकीय कामे लादू नकागडचिरोली : स्थानिक नगर परिषद अंतर्गत आर्थिक व सामाजिक जनगणना २०११ चे काम नगर परिषद शाळेतील शिक्षकांना सोपविण्यात आले आहे. या कामात या शिक्षकांना २०११ च्या जनगणनेतील कामाचे दावे व हरकती निकाली काढण्यासाठी अर्ज भरून द्यावयाचे आहे. सदर काम हे अशैक्षणिक असून शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन कार्य करण्यासोबतच दावे व हरकती स्वीकारावयाचे आहेत. शिक्षकांना अशा प्रकारची अशैक्षणिक कामे वारंवार दिल्या जातात. यावर कास्ट्राईब नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.यावेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र उईके, सचिव रवींद्र पटले, उपाध्यक्ष प्रमोद भानारकर, कोषाध्यक्ष विरेंद्र सोनवाणे आदी उपस्थित होते. आर्थिक, सामाजिक जनगणना २०११ चे काम व सोबत बीएलओचे काम शिक्षकांना सोपविण्यात आले आहे. नेमके कोणते काम करावे, याविषयी संभ्रम असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
न. प. शिक्षक शाळाबाह्य कामावर संतप्त
By admin | Updated: August 5, 2015 01:38 IST