जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले; शेतातील रसायनांच्या वापरामुळे जल प्रदूषण वाढले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:56 IST2025-03-20T16:55:34+5:302025-03-20T16:56:17+5:30

रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम : विषारी रसायनांमुळे पिण्याचे पाणी होतेय दूषित

Nitrate levels have increased in water sources in the district; Has water pollution increased due to the use of chemicals in agriculture? | जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले; शेतातील रसायनांच्या वापरामुळे जल प्रदूषण वाढले का?

Nitrate levels have increased in water sources in the district; Has water pollution increased due to the use of chemicals in agriculture?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत असल्याचे पाणी तपासणीत आढळून आलेले आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्व्हे केला होता. शेतांमध्ये होणारा रसायनांचा वारेमाप वावर, तसेच इतर कारणांनी रसायनांच्या माध्यमातून होणारे जलप्रदूषण, आदी कारणांमुळे पिण्याचे पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे.


जिल्ह्यात वायू प्रदूषणासह आता जलप्रदूषणही वाढत आहे. विशेषतः शेतातील रासायनिक खतांचे अंश जमिनीतील पाण्यातही उतरत आहेत. जिल्ह्यातील ८ हजार २५० पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी केली असता त्यातील ४२ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले. १६,०८९ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ८ हजार २५० नमुने रासायनिक पद्धतीने, तर ७हजार ८३९ नमुने जैविक पद्धतीने तपासण्यात आले.


बागायतमध्ये जास्त प्रमाण
पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. बागायत क्षेत्रातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलेले आहे.


३७३ नमुने पिण्याअयोग्य
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यांच्या जलस्रोतातून घेण्यात आलेले एकूण ३७३ नमुने पिण्याअयोग्य आहेत. यात रासायनिकचे १८२, तर जैविक तपासणीतील १९१ पाणी नमुन्यांचा समावेश आहे.


फ्लोराइडही आढळले
अनेक गावांना नदी, नाले व तलाव परिसरातून नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शेती पिकांसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात.


आरोग्यावर नायट्रेटचे काय परिणाम होतात ?
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्यास रक्ताभिसरणासंबंधातील आजार होतात. लहान मुलांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुले दगावू शकतात. पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असणे धोकादायकच ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे.


"शेतात रासायनिक खतांचा वापर, तसेच विषारी रसायनांच्या वापरासह अन्य कारणांनी जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे भूमी, वायू व आता जलप्रदूषणही वाढत आहे."
- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ

Web Title: Nitrate levels have increased in water sources in the district; Has water pollution increased due to the use of chemicals in agriculture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.