गडचिरोलीत दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन उलटून ९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:46 IST2018-02-14T14:46:01+5:302018-02-14T14:46:17+5:30

अहेरी तालुक्यातील लगामकडून चौडमपल्लीकडे जाणारे बोलेरो हे वाहन बुधवारी सकाळी उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Nine people injured in road accident in Gadchiroli | गडचिरोलीत दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन उलटून ९ जण जखमी

गडचिरोलीत दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन उलटून ९ जण जखमी

ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील लगामकडून चौडमपल्लीकडे जाणारे बोलेरो हे वाहन बुधवारी सकाळी उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे सांगितले जाते. अहेरीवरून लग्नकार्यासाठी निघालेले हे वाहन काही अंतर गेल्यानंतर अपघातग्रस्त झाले. यात वाहन चालक सागर संतोषवार, लीलाबाई आईंचवार हे दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अन्य जखमींमद्ये सतीश ओलेटिवार, पल्लवी ओलेटिवार, वासवी ओलेटिवार हे जखमी झाले आहेत. जखमींना आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची बातमी कळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व सोनाली कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली.
 

Web Title: Nine people injured in road accident in Gadchiroli

टॅग्स :Accidentअपघात