नऊ महिन्यांचे अनुदान थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:28+5:30

निराधारांना संजय गांधी निराधार याेजना, श्रावण बाळ याेजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ  याेजना आदी याेजनांच्या माध्यमातून मासिक अनुदान दिले जाते. परंतु तालुक्यातील निराधारांना नऊ महिन्यांपासून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक तहसील कार्यालय व बँकेत हेलपाटे मारत आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत अनुदान न मिळाल्याने  निराधारांचे हाल झाले. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

Nine months grant exhausted | नऊ महिन्यांचे अनुदान थकीत

नऊ महिन्यांचे अनुदान थकीत

googlenewsNext
ठळक मुद्देचामाेर्शी तालुका : १५ हजार नागरिकांचे तहसील कार्यालयात हेलपाटे

लाेकमत न्यूज नेटवर्क
चामाेर्शी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने निराधारांना मासिक १ हजार ते १ हजार २०० रूपये अर्थसहाय्य अनुदानाच्या रूपात  दिले जाते. तालुक्यात १५ हजार ३७४ नागरिक शासनाच्या याेजनेचा लाभ घेतात. परंतु तालुक्यातील निराधारांना फेब्रुवारी महिन्यापासून मासिक अनुदान मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक तहसील कार्यालय व बँकेत हेलपाटे मारत आहेत. 
निराधारांना संजय गांधी निराधार याेजना, श्रावण बाळ याेजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ  याेजना आदी याेजनांच्या माध्यमातून मासिक अनुदान दिले जाते. परंतु तालुक्यातील निराधारांना नऊ महिन्यांपासून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक तहसील कार्यालय व बँकेत हेलपाटे मारत आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत अनुदान न मिळाल्याने  निराधारांचे हाल झाले. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. रखडलेले अनुदान लवकर द्यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी  लाभार्थ्यांसमवेत तहसील कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवून नऊ महिन्यांचे अनुदान लवकर देण्याची मागणी केली. याप्रसंगी भाजप अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, स्वप्निल वरघंटे,  पं. स. सदस्य रेवनाथ कुसराम, उत्तम मेश्राम, सुनील राऊत यांच्यासह निराधार व कार्यकर्ते उपस्थित हाेते. 
दिवाळीपूर्वी रखडलेले अनुदान द्या
राज्य सरकारने अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व ओबीसींच्या याेजनांच्या निधीत  ६७ टक्के कपात केली.  वर्ग ३ व ४ ची नाेकरभरती कंत्राटी पद्धतीत त्रयस्थ संस्थेकडून करवून घेतली. तरीसुद्धा निराधारांच्या अनुदानाचा पैसा दिला नाही. राज्य शासन ८५ टक्के असलेल्या लाेकांवर अन्याय करीत आहे. निराधारांची फेब्रुवारी महिन्यापासून रखडलेले अनुदान  दिवाळी सणापूर्वी द्यावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Web Title: Nine months grant exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.