वृत्तपत्र विक्रेत्यांचे आजपासून अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:28 IST2025-01-26T10:27:57+5:302025-01-26T10:28:12+5:30
या अधिवेशनाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स स्टील प्लॅन्ट कोनसरी कंपनीचे रेसिडेन्शिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांचे आजपासून अधिवेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन दि. २६ व २७ जानेवारीला येथील संस्कृती सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे. या अधिवेशनासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसह राज्यभरातून वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
या अधिवेशनाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स स्टील प्लॅन्ट कोनसरी कंपनीचे रेसिडेन्शिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खनिकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर राहतील. खासदार डाॅ. नामदेव किरसान, आमदार संजय केळकर, डाॅ. आमदार मिलिंद नरोटे, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार रामदास मसराम, संघटनेचे अध्यक्ष पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत आदी उपस्थित राहाणार आहेत. अधिवेशनाला वृत्तपत्र विक्रेत्यांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, वर्तमानपत्र विक्रेता संघटना छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष नीलेश फाटके, काकासाहेब मानकापे, भाऊसाहेब घुगे यांनी केले आहे.
बैठकांसह खुली चर्चा
रविवारी (दि. २६) दुपारी ४ वाजता संघटनेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कार्य समितीची बैठक होणार आहे. ६ वाजता सर्वसाधारण सभा होईल. रात्री ८ वाजता खुली चर्चा होणार आहे. खुले अधिवेशन सोमवारी पार पडणार आहे.