अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच नवविवाहितेने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:49+5:302021-03-15T04:32:49+5:30

तालुका मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेगाव गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट पांडूटोला येथील आदेश घाटघूमर या युवकाचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी ...

The newlyweds ended their life before the turmeric came off | अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच नवविवाहितेने संपविली जीवनयात्रा

अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच नवविवाहितेने संपविली जीवनयात्रा

तालुका मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडेगाव गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट पांडूटोला येथील आदेश घाटघूमर या युवकाचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील तोमेश्वरी नामक मुलीशी २४ फेब्रुवारीला थाटामाटात लग्न झाले. लग्न होऊन ती सासरी आली. दोघेही जण आनंदातच हाेते. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तोमेश्वरीने आपल्या पतीला जेवू घातले व सोबत दुपारच्या जेवणाचा डबा करून दिला डबा घेऊन आदेश शहरात इमारतीच्या रंगरंगोटीच्या कामावर निघून गेला. दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तोमेश्वरीने विष प्राशन केले. तिच्या नाका तोंडातून फेस येत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिला वाचविण्यासाठी येथील डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली; परंतु तिच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. रात्री १२ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

Web Title: The newlyweds ended their life before the turmeric came off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.