आरमोरी बर्डी परिसरात होणार नवे सभागृह

By Admin | Updated: May 22, 2016 01:00 IST2016-05-22T01:00:16+5:302016-05-22T01:00:16+5:30

येथील सीताबर्डी भागात स्थानिक आमदार निधीतून सभामंडप मंजूर करण्यात आले.

New Hall to be built in Armori Birdy area | आरमोरी बर्डी परिसरात होणार नवे सभागृह

आरमोरी बर्डी परिसरात होणार नवे सभागृह

भूमिपूजन कार्यक्रम : आमदार निधी उपलब्ध
आरमोरी : येथील सीताबर्डी भागात स्थानिक आमदार निधीतून सभामंडप मंजूर करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आ. क्रिष्णा गजबे व नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्य वेणूू ढवगाये, भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, शिवसेना तालुकाध्यक्ष माणिक भोयर, गोपिचंद मने, शंकर बावनकर, भारत बावनथडे, पंकज खरवडे, माजी ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर ढवगाये, सदानंद कुथे, मनोज मने, नंदू नाकतोडे, सुधीर सपाटे, महेंद्र शेंडे, सुनील चरडुके, कुणाल भरणे, राहुल तितीरमारे, सचिन बेहरे, रोहित धकाते, चंदू आकरे, स्वप्नील धात्रक, गोलू वाघरे, जितेंद्र ठाकरे, कुणाल भरणे, अंकित तुमसरे व बर्डी येथील नागरिक उपस्थित होते. सभामंडप होत असल्याने बर्डी येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. विविध कामासाठी सभामंडप उपयोगी येईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: New Hall to be built in Armori Birdy area