नव्या बसगाड्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST2021-07-07T04:45:12+5:302021-07-07T04:45:12+5:30
अहेरी : अहेरी हे राज्यातील सर्वांत जुने एसटी आगार आहे. येथून लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या जातात. मात्र, बहुतांश गाड्या ...

नव्या बसगाड्यांची गरज
अहेरी : अहेरी हे राज्यातील सर्वांत जुने एसटी आगार आहे. येथून लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या जातात. मात्र, बहुतांश गाड्या जुनाट आहे. त्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहे. येथून आंतरराज्यीय बससेवाही चालविली जाते. या आगाराला सरकारने नव्या गाड्या द्याव्या, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
शस्त्रक्रियेला प्रतिसाद कमी
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.
निधीअभावी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या वतीने शेकडो बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या बंधाऱ्यांसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले आहे. निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
गडचिरोली शहरात बगिचा तयार करा
गडचिरोली : शहरात सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक फिरायला जात असतात. मात्र, शहरात कुठेही बसण्यासाठी बगिचा नसल्याने शहरात बगिचा तयार करण्याची मागणी होत आहे. न.प.मधील एकमेव बगिचाही नष्ट झाला आहे.
सिरोंचा भागात वृक्षतोड
सिरोंचा : तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या अवैध वृक्षतोड जोमात सुरू आहे. छत्तीसगड राज्यातील तस्कर नदीमार्ग मोठ्याप्रमाणावर मौल्यवान सागवान घेऊन जात आहेत. वनविभागाने मोहीम तीव्र केली असली तरी तस्करी सुरूच आहे. अनेक जण तेलंगणात सागवानाची तस्करी करतात.
तलावाभोवती अतिक्रमण
गडचिरोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचन विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न हाेत आहे. तलाव साैंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे.
विश्रामगृहाची मागणी
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे.
गोकुलनगरात रस्ते खड्डेमय
गडचिरोली : शहरातील गोकुलनगरातील अनेक अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून लगतच्या नागरिकांनी साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली. न.पं.ने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. काही रस्त्यांची मागील चार वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही.
फलकाचा अभाव
घोट : घोट-रेगडी-विकासपल्ली मार्गाला जोडणाऱ्या निकतवाडा-नवेगाव या मार्गावर गतिरोधक आहे. मात्र, गतिरोधक असल्याचा फलक नाही. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या सुमारास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित विभागाने या ठिकाणी गतिरोधक फलक लावले नाहीत.
सिरोंचात डास वाढले
सिरोंचा : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. नगर पंचायतीने शहरात फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.