शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेत टिकण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 00:57 IST

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब जाधव यांचे प्रतिपादन : कमलापूर येथे परीक्षा केंद्राचा शुभारंभकमलापूर : स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन मिळाल्यास येथील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडणार नाही, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले. उपपोलीस स्टेशन रेपनपल्लीतर्फे कमलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ९ जानेवारी रोजी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच रजनीता मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेर, बाबा आमटे फाऊंडेशन कमलापूरचे तुरकर, डॉ. सोमेश्वर सेलोकर, श्रीधर दुग्गीरालापाटी, सचिन ओलीटीवार, पोचन्ना चौधरी, कोरके पाटील, अनंत कोहाडे, चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना अण्णासाहेब जाधव म्हणाले, १९५८ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कमलापूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू केली. येथील व जिल्ह्यातील विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेऊन चांगल्या पदावर कार्यरत आहेत. ही अत्यंत चांगली बाब आहे. देश डिजिटलाझेशनकडे वळत चालला आहे. येणाऱ्या काळात शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांमध्ये टिकून नोकरी मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. सदर मार्गदर्शन केंद्र येथील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक दुरफडे, संचालन व आभारढोबळे यांनी मानले. (वार्ताहर)