स्वयंसुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:20+5:302021-05-01T04:34:20+5:30
आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयात महिला सुरक्षा कार्यशाळेत प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. ...

स्वयंसुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज
आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयात महिला सुरक्षा कार्यशाळेत प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकात डोर्लीकर होते. यावेळी महिलाराज आणि महिला सक्षमीकरण समितीच्या पदाधिकारी प्रा. सुनंदा कुमरे, प्रा. सीमा नागदेवे व प्रा. स्नेहा मोहुर्ले सहभागी होत्या.
याप्रसंगी दीपांजली गावीत यांनी महिलांनी स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारची न्यूनगंडाची भावना न जोपासता प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे. एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यास तिच्यासाठी दिवे पेटवून काही उपयोगाचे नाही तर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन होण्याची अत्यंत गरज आहे असे सांगितले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी महिलांना माणूस म्हणून सन्मान देण्याची आवश्यकता स्पष्ट केली. त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून स्त्री-सुरक्षा आणि महिला सन्मानाचा संदेश समाजात रुजण्याचा आशावाद व्यक्त केला. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पाैर्णिमा चहांदे, ॲड. नर्गिस पठाण, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा. सुनंदा कुमरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सीमा नागदेवे यांनी केला, तर आभार प्रा. स्नेहा मोहुर्ले यांनी मानले. तंत्रसहाय प्रा. सुनील चुटे, प्रशांत दडमल यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर कुथे, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.