उमानूर ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:38 IST2019-03-25T22:38:30+5:302019-03-25T22:38:45+5:30

तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.

NCP's supremacy over Umanur Gram Panchayat | उमानूर ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे वर्चस्व

उमानूर ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे वर्चस्व

ठळक मुद्देआविसंचे चार उमेदवार जिंकले : सरपंचासह नऊपैकी पाच ग्रामपंचायत सदस्य विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.
राष्ट्रवादीच्या पॅनलचे सरपंचासह पाच उमेदवार तर आविसंचे चार उमेदवार निवडून आले आहेत. सरपंचपदी राकाँचे श्रीनिवास गावडे हे निवडून आले आहेत. त्यांनी आविसंचे जयवंत तलांडे यांचा पराभव केला. ग्राम पंचायत सदस्यांमध्ये रवींद्र व्यंकटी कोरेत, वंदना बापू गावडे, गणपत कोडापे, मेड्डीना पानेम, शांता सडमेक यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे आहेत. तर आविसंच्या मनीषा तलांडे, अटेला राजन्ना, कुमरी कविता, वासम तारा हे चार सदस्य निवडून आले आहेत. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकारी जिल्हाध्यक्ष शाहीम हकिम, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन आत्राम, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, नगरसेवक अमोल मुक्कावार, संतोष बोम्मावार, लक्ष्मण येर्रावार, कैलास कोरेत, बापूराव तोरेम, सांबय्या करपेत, महेश अलोणे, अप्सर पठाण, बापू तोडसाम, शंकर नैताम, लालू वेलादी, गुड्डू शेख, सालय्या कंबालवार, शैलेश गेडाम, जगदीश दुर्गे, मलय्या आत्राम आदी उपस्थित होते. निवडणुकीनंतर गावात जाऊन जल्लोष करण्यात आला. गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खेचून आणला जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी व्यक्त केला.

Web Title: NCP's supremacy over Umanur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.