रा.काँ. पदाधिकाऱ्यांनी जाणल्या काेविड केअर सेंटरमधील समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:49+5:302021-05-11T04:38:49+5:30
अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी आरोग्यवर्धिनी कोविड लस व कोविड ...

रा.काँ. पदाधिकाऱ्यांनी जाणल्या काेविड केअर सेंटरमधील समस्या
अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी आरोग्यवर्धिनी कोविड लस व कोविड टेस्टिंग सेंटर आल्लापल्ली, मुलांचे शासकीय वसतिगृह कोविड सेंटर आल्लापली, मुलींचे वसतिगृह कोविड सेंटर,नागेपल्ली या तीनही कोविड सेंटरमध्ये वस्तू व साहित्य वाटप करण्यात आले, तसेच शाहीन हकीम यांनी कोविड रुग्णांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. ग्रामपंचायत आल्लापल्ली यांच्यातर्फे मुलांचे वसतिगृह कोविड सेंटर या ठिकाणी मास्क, हातमाेजे, सॅनिटायझर देण्यात आले. याप्रसंगी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, डॉ.अल्का उईके, ग्रामसेविका संध्या गेडाम, संगीता महालदार, एस. एम. बोधमवार, रमेश कोसनकर, लक्ष्मण येर्रावार, पराग पांढरे, नफी खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
100521\10gad_3_10052021_30.jpg
===Caption===
काेविड केअर सेंटरला साहित्य देताना शाहिन हकीम, साेबत पदाधिकारी.