शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

गडचिरोलीतील नक्षल चकमकी बनावट, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:52 IST

एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात नक्षलींशी झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी आहे.

गडचिरोली - एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात नक्षलींशी झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी आहे.या समितीमध्ये मानवाधिकार संदर्भात काम करणाऱ्या विविध संघटनाच्या ४४ सदस्यांचा समावेश होता. त्यांनी दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून या चकमकी संदर्भातील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात कसनासूर जंगलात चकमक घडलीच नाही. तर पोलिसांनी मृतकांना चारही बाजूने घेरून त्यांच्यावर हॅन्ड ग्रेनेड व लॉन्चर फेकले. त्याचबरोबर चारही बाजूने फायरिंग झाली. मृतकांनी मात्र फायरिंग केली नाही. त्यामुळे याला चकमक म्हणणे चुकीचे असून ही एक प्रकारची सामूहिक हत्या आहे, असा आरोप समिती सदस्यांनी केला. जे लोक मारले गेले, त्यामध्ये काही गावक-यांचासुध्दा समावेश आहे. पोलिसांनी सुध्दा त्यांना बेपत्ता दाखविले आहे. २२ एप्रिलच्या चकमकीत नक्षल कमांडर नंदू व त्याच्या इतर सहा साथीदारांना पोलिसांनी जिवंत पकडले व नंदूकडून नक्षलींनी राजाराम जंगलात साठलेला पैसा शोधून काढल्यानंतर त्याच्यावर व इतर साथीदारांवर गोळ्या झाडल्याचे समितीचे सदस्य म्हणाले. ४० मृतदेहांपैकी केवळ दोघांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्याचे डॉक्टरांनी समिती सदस्यांना सांगितल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पत्रकार परिषदेला आशिष गुप्ता, एन. नारायणराव, व्ही. रघुनाथ, क्रांती चैतन्य, एन. गंगाधर, डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते.या आरोपांसंदर्भात पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, हे आरोप बिनबुडाचे असून सत्यावर आधारित नसल्याचे ते म्हणाले. मृत नक्षल्यांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्या असून तसा शवविच्छेदन अहवालही असल्याचे सांगितले.चौकशीतून सत्य समोर येईल या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते समोर येईलच. त्यानुसार कारवाई केली जाईल. सोबतच एनएचआरसीला रिपोर्ट पाठविल्या जाईल, असे गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र