गडचिरोलीत पोलीस चकमकीत एक नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:50 IST2020-07-03T19:50:08+5:302020-07-03T19:50:33+5:30

पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातील सी-६० पथक गस्त करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला पोलिसांनीही गोळीने प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला.

A Naxalite was killed in a police encounter in Gadchiroli | गडचिरोलीत पोलीस चकमकीत एक नक्षलवादी ठार

गडचिरोलीत पोलीस चकमकीत एक नक्षलवादी ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक हेडरी पोलीस मदत केंद्रांतर्गत गट्टा परिसरातील जंगलात शुक्रवारी (दि.३) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातील सी-६० पथक गस्त करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला पोलिसांनीही गोळीने प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. मात्र नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत पोलिसांच्या गोळीने ठार झालेल्या एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून एक बंदूक, २० पिट्टू तसेच मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. त्या परिसरात नक्षलवाद्यांचा कॅम्प होता, तो उधळल्या गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A Naxalite was killed in a police encounter in Gadchiroli