नक्षल कमांडरचा कोरोनाने मृत्यू; तीन सहकाऱ्यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 23:29 IST2021-05-27T23:29:21+5:302021-05-27T23:29:32+5:30
Naxal commander died: नक्षलवाद्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त दोन आठवड्यांपूर्वी लोकमतने दिले होते. या घटनेने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नक्षल कमांडरचा कोरोनाने मृत्यू; तीन सहकाऱ्यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक
गडचिरोली : तेलंगणा राज्यातील कोत्तागुडम जिल्ह्यात सक्रिय असलेल्या नक्षल कमांडर आयतू उर्फ कोरसा गंगा याचा कोरोना संक्रमणाने उपचारादरम्यान सरकारी रुग्णालयात गुरूवारी मृत्यू झाला.
दरम्यान त्याला रुग्णालयात पोहोचवून परत जाणाऱ्या तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले. नक्षलवाद्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त दोन आठवड्यांपूर्वी लोकमतने दिले होते. या घटनेने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान अटक केलेल्या नक्षलींकडून याबाबतची सविस्तर माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. कोत्तागुडम जिल्हा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याला लागून आहे. सुकमा जिल्ह्यातही अनेक नक्षलवादी कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.