नक्षल बॅनरमुळे पेरमिलीत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:19 IST2018-09-10T00:18:12+5:302018-09-10T00:19:22+5:30
अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ नक्षल बॅनर आढळून आल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पेरमिली गावापासून एक किमी अंतरावर रविवारी सकाळी लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळून आले. सरकार जनतेचे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

नक्षल बॅनरमुळे पेरमिलीत दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली : अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ नक्षल बॅनर आढळून आल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
पेरमिली गावापासून एक किमी अंतरावर रविवारी सकाळी लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळून आले. सरकार जनतेचे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भीमा-कोरेगाव येथे दलित, आदीवासी, अल्पसंख्यांक यांच्यावर झालेला हल्ला हा भाजपा सरकारचीच चाल असल्याचे म्हटले आहे. वरवर राव, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईचाही निषेध बॅनरमधून केला आहे.
बॅनरवर पेरमिली एरिया कमिटी असे लिहिण्यात आले आहे. नक्षल बॅनरच्या परिसरात नक्षल पत्रकेही टाकण्यात आली होती. यामध्ये पोलिसांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे छायाचित्र आहेत. बऱ्याच दिवसानंतर पेरमिली परिसरात नक्षल बॅनर आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.