जिल्ह्यात नवरात्रीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:42+5:30

नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. जिल्हाभरात दुर्गा व शारदा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सदर सण पुढील नऊ दिवस दसऱ्यापर्यंत चालणार असल्याने नवरात्रीच्या तयारीसाठी ग्रामीण भाग व शहरातही भाविकांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत होते.

Navratri Approx in the district | जिल्ह्यात नवरात्रीची लगबग

जिल्ह्यात नवरात्रीची लगबग

ठळक मुद्देदुर्गा व शारदा मातेची प्रतिष्ठापणा : नऊ दिवस राहणार कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. जिल्हाभरात दुर्गा व शारदा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सदर सण पुढील नऊ दिवस दसऱ्यापर्यंत चालणार असल्याने नवरात्रीच्या तयारीसाठी ग्रामीण भाग व शहरातही भाविकांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत होते.
गडचिरोली जिल्ह्यात नवरात्र उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. आरमोरी येथील नवरात्र उत्सव विदर्भात प्रसिध्द आहे. या उत्सवादरम्यान डोळ्याचे पारणे फिटणारे विविध देखावे तयार केले जातात. देवीचे दर्शन घेण्याबरोबरच देखावे पाहण्याची परवणी भाविकांसाठी उपलब्ध होते. त्यामुळे आरमोरी येथे गर्दी उसळते. गडचिरोलीमध्ये सुध्दा दुर्गा उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. दुर्गा उत्सवादरम्यान नऊ दिवस दुर्गा व शारदा मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शहरात दांडीया नृत्यांची रेलचेल राहते. तर ग्रामीण भागातही विविध मैदानी तसेच संगीतावर आधारीत स्पर्धा आयोजित केल्या जातात. पहाटेपासून सुरू होणाºया पूजा-अर्चेमुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते. नवरात्र दरम्यान अनेक भाविक उपवास पकडत असल्याने नवरात्रीचे विशेष महत्त्व भाविकांनाही जाणवते. या कालावधीत आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होते.

पावसाचा जोर कायम
पावसाचा जोर अजुनही कायम आहे. दर दिवशी पाऊस पडत आहे. त्यामुळे गणपती मंडळांप्रमाणेच दुर्गा व शारदा उत्सव मंडळांना सुध्दा वॉटरप्रुफ पेंडॉल बनवावा लागणार आहे. आचारसंहितेचे पालन करीत दुर्गा उत्सव साजरा करावा लागणार आहे.

Web Title: Navratri Approx in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.