कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:32+5:30

या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले.

The nature of the movement against the Corona campaign | कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप

कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी दीपक सिंगला : जिल्ह्यात ६६ हजार कुटुंबातील २ लाख ३७ हजार जणांची तपासणी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना संसर्गाला लढा देण्यासाठी तसेच स्वत:हून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढत आहे. कोरोनाबाबत शासनाकडून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम एक चळवळ म्हणून पुढे येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले. तसेच आॅक्सिजन पातळी आवश्यक ९५ पेक्षा जास्त नसलेले ९११ नागरिक आढळून आले आहेत. यातील संभावित रूग्ण म्हणून ५०६ जणांना आशा व पथकाने जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित केले आहे. त्याठिकाणी त्यांची पुढील चाचणी होणार आहे.
संदर्भित केलेल्या ५०६ व्यक्तींपैकी शनिवारपर्यंत कोविड तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ जणांपैकी ३ जण कोरोनाबाधित आढळले. उर्वरीत जणांची तपासणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे येत्या कालावधीत होणार आहे.

कित्येक नागरिकांना स्वत:ला असलेल्या जुन्या आजारांबद्दल माहिती नसते. अशावेळी कोरोना संसर्ग धोकादायक ठरू शकतो. कोरोना संसर्ग झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. या संसर्गावर जरी औषध नसले तरी वेळेत दवाखान्यात दाखल करून संसर्गाची वाढ रोखण्यासाठी प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठीची औषधे, तसेच इतर आजारांवरील उपचार तातडीने देता येतो आणि त्या ठिकाणी आॅक्सिजन व्यवस्था असते त्याचाही वापर आवश्यकतेनुसार करण्यात येतो. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८०० हून अधिक जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. आता जिल्ह्यात कोरोना लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या इच्छेनुसार घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला जरी इतर आजार असला आणि वेळेत उपचार केले तर कोरोनावर मात करणे शक्य असते. आतापर्यंत बहूतेक जण उशीरा दवाखान्यात दाखल झाल्यानेच मृत्यू झाल्याच्या नोंदी जास्त वाढतात असे सर्वदूर आहे. वेळेत उपचार सेवा देण्यासाठी व मृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम महत्वाची आहे, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी म्हटले आहे.

पाच मिनिटात तपासणी होते पूर्ण
या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, आॅक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, आॅक्सिजन कमी भरणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-१९ च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातात. प्रत्येक घरात फक्त ५ मिनीटात तपासणी पूर्ण होते.

अशी घ्या काळजी
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: The nature of the movement against the Corona campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.