भाजपच्या वतीने ‘नमो’ भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST2021-05-19T04:37:48+5:302021-05-19T04:37:48+5:30
संचारबंदीमुळे हाॅटेल, नास्ता सेंटर बंद आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय ...

भाजपच्या वतीने ‘नमो’ भोजन
संचारबंदीमुळे हाॅटेल, नास्ता सेंटर बंद आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली शहर व अल्पसंख्याक मोर्चातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाच्या स्टाॅलला ‘नमाे भाेजन’ हे नाव देण्यात आले आहे. भाेजन स्टाॅलचा शुभारंभ १७ मे राेजी करण्यात आला. यावेळी जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, न. प. उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, नगरसेवक तथा शहर महामंत्री केशव निंबोड, महामंत्री विनोद देवोजवार, भाजयुमोचे शहर अध्यक्ष सागर कुमरे, सचिव सुहास उप्पलवार, अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष सलीम शेख, महामंत्री इमरान शेख, जिल्हा महामंत्री जावेद अली सय्यद आदी उपस्थित होते. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजता १५० लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.