जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला पतीसह ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 10:47 IST2019-06-12T10:47:36+5:302019-06-12T10:47:45+5:30
नक्षल्यांची कुख्यात महिला नेता नर्मदाक्काला पतीसह अटक करण्यात आली आहे.

जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला पतीसह ठोकल्या बेड्या
गडचिरोलीः नक्षल्यांची कुख्यात महिला नेता नर्मदाक्काला पतीसह अटक करण्यात आली आहे. गडचिरोली आणि तेलंगणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नर्मदाक्काला बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. अटकेत असलेल्या नर्मदाक्काच्या नावावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ ती नक्षलवादी चळवळीत कार्यरत होती. विशेष म्हणजे तिच्या पतीलाही या कारवाईदरम्यान कंठस्नान घालण्यात आलं आहे.
नर्मदाक्का आहे तरी कोण?
नर्मदाक्का ही नक्षलवादी चळवळ संघटनेतील एक महत्त्वाची सदस्य आहे. ती मुळची आंध्रप्रदेशची आहे. जेथे तिचं शिक्षणही झालं आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश या ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत.