गळफास घेणाऱ्या वडिलांनीच केली माझ्या आईची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:56+5:302021-06-20T04:24:56+5:30

शुक्रवार १८ जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. आपली सायकल मागण्यासाठी स्थानिक गावकरी जनार्दन कोटरंगे (५० वर्ष) ...

My mother was killed by her hanging father | गळफास घेणाऱ्या वडिलांनीच केली माझ्या आईची हत्या

गळफास घेणाऱ्या वडिलांनीच केली माझ्या आईची हत्या

शुक्रवार १८ जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. आपली सायकल मागण्यासाठी स्थानिक गावकरी जनार्दन कोटरंगे (५० वर्ष) यांच्या घरी गेला असता त्याला घरातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. सोबतच दरवाजा आतून बंदही असल्याचे दिसून आले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता जनार्दनची पत्नी पोचूबाई (४८ वर्षे) पडून असलेली, तर जनार्दन गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. त्याने लगेच गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती अहेरी पोलिसांना कळविली. सासुरवाडीला कामानिमित्त गेलेल्या मुलालासुद्धा घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुलगा देवानंद गावी परतला.

(बॉक्स)

बाहेरच्या व्यक्तीचा हात नाही

घराचा मागचा व पुढचा दोन्ही दरवाजे बंद होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे बाहेरील कोणी व्यक्ती असण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, मृत दाम्पत्याच्या मुलाने अहेरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यात वडिलांनीच आईचा खून करून स्वतः गळफास घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या घटनेमागे कोणत्या तरी कारणाने पती-पत्नीमधील वादविवाद असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: My mother was killed by her hanging father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.