शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

किमान वेतनासाठी पालिका कामगार उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला मिळतात. देसाईगंज नगरपालिकेत शंभराहून जास्त रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. किमान वेतनानुसार वेतन न देता अर्ध्यापेक्षा कमी मजुरीवर त्यांना राबवून घेतले जाते, असा आराेपही कामगारांनी केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कामगारांच्या सततच्या लढ्यामुळे शासनाला किमान वेतन कायदा करावा लागला. त्यानुसार कामगारांचे किमान वेतन घोषित करण्यात आले. दर सहा महिन्यांनी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढदेखील केली जाते. कामगारांना अन्य योजनेचा लाभसुद्धा दिला जाताे; परंतु देसाईगंज नगरपरिषदअंतर्गत कार्यरत कामगारांना किमान वेतन न देता अल्प मानधन दिले जात असून, यातून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. तसेच याविराेधात आवाज उठविणाऱ्या कामगारांना नाेटीस न देताच कामावरून काढण्यात आले आहे, असा आराेप करीत कामगारांनी बुधवारी रस्त्यावर उतरून आंदाेलन केले.एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला मिळतात. देसाईगंज नगरपालिकेत शंभराहून जास्त रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. किमान वेतनानुसार वेतन न देता अर्ध्यापेक्षा कमी मजुरीवर त्यांना राबवून घेतले जाते, असा आराेपही कामगारांनी केला. यासाठी कामगारांना किमान वेतन, बॅंकेमार्फत पगार देण्यात यावा, या मागणीला घेऊन नगर परिषदेसमोर कामगारांनी धरणे आंदाेलन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी याेग्य निर्णय घ्यावा. तसेच या संदर्भात जिल्हा प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे, कार्याध्यक्ष प्रमोद गोडघाटे, अमोल मारकवार, साजीदा पठाण, संदीप लोखंडे, सुरेश राऊत, दुर्गा करंडे, नीरा हाडे, श्रध्दा पिंपळकर, माधुरी निमकर उपस्थित हाेते. 

आश्वासन हवेत विरले काय?-    शासन निर्णयानुसार कामगारांना किमान वेतन द्यावे, या मागणीला घेऊन मागील महिन्यात कामगारांनी धरणे आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले हाेते. तेव्हा किमान वेतन तसेच बँकेमार्फत वेतन देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु महिना उलटूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले काय? असा सवाल नगरपरिषदेच्या कामगारांनी धरणे आंदाेलनादरम्यान केला.-    कामगारांना किमान वेतन न देता त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही, असा सवालही कामगारांनी आंदाेलनादरम्यान केला. 

 

टॅग्स :agitationआंदोलनStrikeसंप