खासदारांनी घेतला कोरचीतील कोविड स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:50+5:302021-05-12T04:37:50+5:30
कोरची तहसील कार्यालयात १० मे रोजी आयोजित कोविडच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते. यावेळी आमदार कृष्णा ...

खासदारांनी घेतला कोरचीतील कोविड स्थितीचा आढावा
कोरची तहसील कार्यालयात १० मे रोजी आयोजित कोविडच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते देवराव गजभिये, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री आनंद चौबे, कोरची तालुका सोशल मीडियाप्रमुख नंदू पंजवानी, माजी नगरसेवक घनश्याम अग्रवाल, तहसीलदार छगनलाल भंडारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, नगरपंचायत उपमुख्याधिकारी बाबासोा हाके व सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले आदी उपस्थित होते.
खासदार अशोक नेते यांनी कोविडचा आढावा घेतला असता, आतापर्यंत एकूण ३६३ कोरोनाबाधित झाले असून, सद्य:स्थितीत ३२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. कोरची येथे दोन कोविड केअर सेंटर असून, तालुक्यात चार लसीकरण केंद्रे आहेत. चार ऑक्सिजन सिलिंडर असून, आतापर्यंत २ हजार ९८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ११० लस उपलब्ध असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी दिली. जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असून, अधिकाऱ्यांनी जनजागृती शिबिर घेऊन लोकांना कोविड व लसीकरण संबंधातील माहिती द्यावी व कोरोना रुग्णांवर योग्य उपचार करावेत अशा सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.
===Photopath===
110521\11gad_1_11052021_30.jpg
===Caption===
आढावा घेताना खा.अशाेक नेते, आ. कृष्णा गजबे.