मागण्यांसाठी डॉक्टरांचे आंदोलन
By Admin | Updated: May 31, 2014 23:28 IST2014-05-31T23:28:04+5:302014-05-31T23:28:04+5:30
डॉक्टरांच्या विविध मागण्यांना घेऊन मॅग्मो संघटनेच्यावतीने शनिवारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेने प्रस्तावित केलेल्या अनेक मागण्या त्

मागण्यांसाठी डॉक्टरांचे आंदोलन
२ जूनपासून काम बंद : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे
गडचिरोली : डॉक्टरांच्या विविध मागण्यांना घेऊन मॅग्मो संघटनेच्यावतीने शनिवारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेने प्रस्तावित केलेल्या अनेक मागण्या त्वरित मान्य न केल्यास २ जूनपासून राज्यभर वैद्यकीय अधिकार्यांच्यावतीने कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मॅग्मो संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
राज्य शासनाकडे डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात अनेकदा मॅग्मो संघटनेच्यावतीने चर्चा करण्यात आली. डॉक्टरांच्या मागण्यांमध्ये २00९-१0 मध्ये समावेशीत वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलक्ष लाभ देणे, अस्थायी बीएएमएस व बीडीएस वैद्यकीय अधिकार्यांचे समावेशन करणे, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्यांना सहावा वेतन आयोग लागू करणे, केंद्र शासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळणे, पदव्यूत्तर वैद्यकीय अधिकार्यांचे खाते अंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे तसेच अ गट वैद्यकीय अधिकार्यांची सेवा ज्येष्ठता यादी तत्काळ तयार करणे, वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांना ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळणे आदींचा समावेश आहे. आंदोलनात डॉ. विजय आकोलकर, डॉ. सचिन हेमके, डॉ. सुनिल मडावी, डॉ. विधान देवरी, डॉ. प्रशांत आखाडे, डॉ. प्रशांत कारेकर, डॉ. प्रविण उमरगेकर आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)