शिवणी बूज येथे राष्ट्रसंतांना मौैन श्रद्धांजली
By Admin | Updated: October 24, 2016 02:08 IST2016-10-24T02:08:18+5:302016-10-24T02:08:18+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त शिवणी बुज येथे मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शिवणी बूज येथे राष्ट्रसंतांना मौैन श्रद्धांजली
पुण्यतिथी सप्ताह : गोपालकाला व महाप्रसाद
आरमोरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त शिवणी बुज येथे मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सप्ताहानिमित्त शिवणी बुज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
शिवणी बुज येथे शेकडो गुरूदेव भक्त आहेत. राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त शनिवारी पहाटेला रामधून काढण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखी काढण्यात आली. दिंडीच्या गजरात गावातून फेरी निघाली. यामध्ये शेकडो गुरूदेव भक्त व नागरिक सहभागी झाले होते. दुपारी ३ वाजता हनुमान मंदिर परिसरात बाबुराव गेडाम महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ४.५८ वाजता मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गोपालकाला व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिवणी बुज येथे शेकडो गुरूदेव भक्त असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व जयंतीचे कार्यक्रम दरवर्षीच उत्साहात साजरे केले जातात. यानिमित्त गावकऱ्यांना राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत मार्गदर्शन केले जाते. आबालवृद्ध या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असल्याने गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते. या सप्ताहाच्या माध्यमातून गावात एकोपा नांदण्यास फार मोठी मदत होते. (शहर प्रतिनिधी)