शहरातील बहुतांश एटीएम कॅशलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:04+5:30

बँकेतील गर्दी कमी व्हावी, लोकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी बँक प्रशासनाच्या वतीने जिल्हा व तालुका मुख्यालय तसेच मोठ्या गावांमध्ये एटीएमची सुविधा करण्यात आली. मात्र शनिवार व रविवारी दोन दिवस गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅशलेस असल्याने ग्राहकांना रोकडसाठी धावपळ करावी लागली.

Most ATMs cashless in the city | शहरातील बहुतांश एटीएम कॅशलेस

शहरातील बहुतांश एटीएम कॅशलेस

ठळक मुद्देपुरेशी रोकड ठेवण्याची मागणी : रोकडसाठी नागरिकांची दोन दिवस धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बँकेतील गर्दी कमी व्हावी, लोकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी बँक प्रशासनाच्या वतीने जिल्हा व तालुका मुख्यालय तसेच मोठ्या गावांमध्ये एटीएमची सुविधा करण्यात आली. मात्र शनिवार व रविवारी दोन दिवस गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅशलेस असल्याने ग्राहकांना रोकडसाठी धावपळ करावी लागली.
गडचिरोली शहरात चंद्रपूर, धानोरा, चामोर्शी या तीन मार्गावर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती व इतर बँकांचे एटीएम आहेत. याशिवाय कॉम्प्लेक्स परिसरात नवेगावपर्यंत एटीएम आहेत. गुरूवारी व शुक्रवारी बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात संपाची हाक दिली होती. मात्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा संप मागे घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर दोन्ही दिवशी राष्ट्रीययकृत बँका सुरू होत्या. चौथा शनिवार व रविवारला बँकांना सुट्टी होती. शनिवारी दुपारी २ वाजतानंतर शहरातील बºयाच एटीएममधील रोकड संपली. त्यामुळे ग्राहक दुसºया ठिकाणच्या एटीएमकडे धाव घेऊ लागले. परिणामी बºयाच लोकांना ऑनलाईन व्यवहार करावा लागला.
शनिवारी व रविवारी दोन दिवस ग्राहकांना एटीएममधून रोकड उपलब्ध करण्यास अडचणी आल्या. सोमवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत चामोर्शी तसेच चंद्रपूर मार्गावरील राष्ट्रीययकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड नव्हती. परिणामी अनेक ग्राहक परत जाताना दिसून आले. कॉम्प्लेक्स परिसरातही एटीएमबाबत अशीच परिस्थिती होती.
आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज या तालुक्यातही शनिवार व रविवारी बºयाच एटीएममध्ये रोकड नसल्याने ग्राहक त्रस्त झाले होते.

जिल्हा सहकारी बँकेच्या एटीएमचा आधार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या शहरात पाच शाखा आहेत. धानोरा मार्गावर मुख्य शाखा, त्रिमूर्ती चौक, आरमोरी मार्ग व कॉम्प्लेक्स परिसरात दोन शाखा आहेत. या सर्व शाखांच्या माध्यमातून एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी सदर बँकेच्या एटीएममध्ये रोकड उपलब्ध होती. ग्राहकांनी एटीएममध्ये येऊन या सेवेचा लाभ घेतला. त्रिमूर्ती चौकातील एटीएमकडे बरेच ग्राहक धाव घेत असल्याचे दिसून आले. राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम कॅशलेस झाल्याने ग्राहकांची धावपळ सुरू झाली. दरम्यान जिल्हा बँकेच्या एटीएममध्ये रोकड असल्याचे कळताच ग्राहकांचा लोंढा या एटीएमकडे वळला.

Web Title: Most ATMs cashless in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.