कामासाठी वनमजुरांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:21 IST2019-07-08T22:21:44+5:302019-07-08T22:21:55+5:30
हाताला कामे द्यावे, यासाठी वनिकरण विभागात काम करणाºया मजुरांनी सोमवारी आंदोलन केले. ठाणेगाव येथील मजूर मागील तीन ते चार दिवसांपासून वनिकरण विभागाच्या कामावर जात आहेत. परंतु कामाच्या ठिकाणी एकही मजूर राहत नसल्याने मजुरांना परत जावे लागत होते.

कामासाठी वनमजुरांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : हाताला कामे द्यावे, यासाठी वनिकरण विभागात काम करणाºया मजुरांनी सोमवारी आंदोलन केले.
ठाणेगाव येथील मजूर मागील तीन ते चार दिवसांपासून वनिकरण विभागाच्या कामावर जात आहेत. परंतु कामाच्या ठिकाणी एकही मजूर राहत नसल्याने मजुरांना परत जावे लागत होते.
८ जुलै रोजी सुध्दा जवळपास १०० ते १५० मजूर कामावर गेले असता, अधिकारी उपस्थित नव्हता. ही माहिती आमदार कृष्णा गजबे यांना देण्यात आली. गजबे यांनी घटनास्थळ गाठून वन परिक्षेत्राधिकारी बारसागडे, आरमोरीचे नायब तहसीलदार कुकुडकर, वनरक्षक मडावी यांच्याशी चर्चा केली.
मजुरांना काम दिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.