१९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 19:46 IST2020-01-07T19:46:19+5:302020-01-07T19:46:23+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ गावांपैकी १५३९ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकाची लागवड होते.

१९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
गडचिरोली : महसूल विभागाने खरीप हंगामा २०१९-२० ची अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील १९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी तर १२९८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचा अहवाल दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ गावांपैकी १५३९ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकाची लागवड होते. यावर्षी त्यातील १४९२ गावांमध्ये पिकांची लागवड झाली होती. त्यापैकी केवळ १९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे तीच गावे दुष्काळसदृश ठरवून शासनाच्या सवलती व मदतीसाठी पात्र ठरू शकतील.
यावर्षी अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी पावसाचा खरीपातील पिकांना फटका बसला आहे. तरीही जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे.