शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या पुढाकाराने मोहसडवा व दारू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

खरपुंडी येथील गाव संघटनेच्या महिला दारूविक्री बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अहिंसक कृतीच्या माध्यमातून त्या दारू व सडवे नष्ट करीत आहेत. जिल्ह्यात झाडीपट्टी नाट्य उत्सव सुरू झाला आहे. खरपुंडी येथेही एका नाटकाचा प्रयोग आयोजित आहे. या प्रयोगामुळे गावात होणारी गर्दी पाहता कठाणी नदीलगत मोहसडवे टाकण्यात आले असून दारू गाळली जात असल्याची माहिती येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली.

ठळक मुद्देखरपुंडी येथे अहिंसक कृती : दंडार नाटकांसाठी टाकला जातोय सडवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील खरपुंडी गावलगत कठाणी नदीच्या काठाने लावलेल्या दारूभत्त्या, साहित्य, मोहसडवा आणि गावठी दारू मुक्तिपथ गाव संघटनेने नष्ट केली. मंगळवारी गावातील महिलांनी मुक्तिपथ तालुका चमुसह ही कारवाई केली. गावात दंडार नाटकासाठी ही दारू गाळली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.खरपुंडी येथील गाव संघटनेच्या महिला दारूविक्री बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अहिंसक कृतीच्या माध्यमातून त्या दारू व सडवे नष्ट करीत आहेत. जिल्ह्यात झाडीपट्टी नाट्य उत्सव सुरू झाला आहे. खरपुंडी येथेही एका नाटकाचा प्रयोग आयोजित आहे. या प्रयोगामुळे गावात होणारी गर्दी पाहता कठाणी नदीलगत मोहसडवे टाकण्यात आले असून दारू गाळली जात असल्याची माहिती येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यांनी मुक्तिपथ तालुका चमुला याची माहिती देत अहिंसक कृतीचे नियोजन केले. नऊ महिला आणि तालुका चमुनी मिळून गावालगत कठाणी नदीकाठाजवळील परिसरात शोधमोहीम सुरू केली. ठिकठिकाणी लपवून ठेवलेला मोहसडवा आणि दारू गाळण्यासाठी उपयोगात येणारे साहित्यही सापडले. हे सर्व साठे व साहित्य गाव संघटनेने नष्ट केले.जवळपास १०० मोहसडवा महिलांनी नष्ट केला. याच दरम्यान एक जण दारू गाळत असल्याचेही निदर्शनास आले. महिलांना पाहून या इसमाने पळ काढला. गाळलेली गावठी दारू आणि भट्टी संघटनेने उद्ध्वस्त केली. मंडईचे निमित्त साधून गावागावांमध्ये दारू गाळण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांनी नाटक असलेल्या गावांमध्ये शोधमोहीम राबविण्याची मागणी गाव संघटना करीत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी