लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील विवेकानंदनगरात दुचाकीवर गावठी मोहाच्या दारूची विक्री करणाऱ्या इसमाकडून स्थानिक महिलांनी मोहाची दारू जप्त केली. हा दारूसाठा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. अभिजित मडावी असे विक्रेत्याचे नाव असून घटनास्थळावरून त्याने पळ काढला. त्याच्यावर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला.शहरातील विवेकानंद नगर परिसरात काही विक्रेते बाहेरून गावठी मोहाची दारू आणून त्याची विक्री करतात. याचा त्रास येथील नागरिकांना होतो. दारूविक्री होत असल्याने पिणाºयांचीही येथे झुंबड उडते. यातून बरेचदा भांडणेही होतात. यामुळे महिला आणि युवतींची कुचंबना होते. राजरोसपणे हा प्रकार सुरु असल्याने संतापलेल्या महिलांना अभिजित मडावी गाडीवर दारू घेऊन त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच त्याला गाठून त्याच्याकडील दारूच्या १५ बाटल्या जप्त केल्या. पोलीसानाही याची माहिती देण्यात आली. पण यामध्ये अभिजित मडावीने पळ काढला. बीट जमादार भुवनेश्वर मडावी यांनी कारवाई करीत दारूसाठा पोलीस स्टेशन मध्ये जमा केला. विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भगवान गेडाम, नीता भारती, किरण पोडचलवार, मंजू गेडाम, सीमा शेंडे, ईशा बोरकर, रेखा खोब्रागडे, रेखा कांबळे, संगीता रामटेके, गीता बारसागडे, सुरेखा सातपुते, सुनिता झुरी, रजनी कोवे, शालिनी गरमळे, नयन ढोलने, दुशीला गेडाम, सुवर्णा गेडाम यांच्यासह परिसरातील महिलांनी केली.कळमटोला येथे खर्राबंदीचा निर्णयतालुक्यातील कळमटोला येथे गुरुवारी गावसंघटनेची बैठक घेऊन संघटना पुनर्गठित करण्यात आली. या बैठकीत गावात खर्राविक्री बंद करण्याचा निर्णय गाव संघटनेने घेतला. तसेच विक्रेत्यावर ५ हजार रुपये दंड ठोठावणार असल्याचेही यावेळी ठरविण्यात आले. कळमटोला या गावी दारूविक्रीबंदीचा ठराव आधीच घेण्यात आला आहे. बैठकीत खर्रा सेवनाने होत असलेले दुष्परिणाम विशद करणारा ‘यमराजाचा फास’ हा लघु चित्रपट दाखविण्यात आला. गाव संघटनेच्या सभेत खर्राविक्री बंदीचा ठराव गावकºयांनी घेतला. गावातील दहा पानठेलेधारकांना नोटीस देण्यात आली. ७ जानेवारीपर्यंत पानठेलाधारकांना स्वत:जवळील सुगंधित तंबाखूचे साठे संपविण्याची मुदत देण्यात आली. यानंतर कुणी खर्रा विक्री करताना आढळल्यास ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय गाव संघटनेने घेतला.
मोहफुलाची दारू केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:56 IST
शहरातील विवेकानंदनगरात दुचाकीवर गावठी मोहाच्या दारूची विक्री करणाऱ्या इसमाकडून स्थानिक महिलांनी मोहाची दारू जप्त केली. हा दारूसाठा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. अभिजित मडावी असे विक्रेत्याचे नाव असून घटनास्थळावरून त्याने पळ काढला.
मोहफुलाची दारू केली जप्त
ठळक मुद्देआरोपी फरार : मुक्तिपथ संघटनेच्या महिलांची विवेकानंदनगरात कारवाई