मोहफूल दारूसह मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:44 IST2019-04-23T23:43:12+5:302019-04-23T23:44:08+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी सोडे मार्गालगत शेतशिवारात मंगळवारी धाड टाकून येथून मोहफूल दारूसह ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

The Mohawk darahah mahalam seized | मोहफूल दारूसह मुद्देमाल जप्त

मोहफूल दारूसह मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देएका आरोपीला अटक, दोन फरार : सोडे मार्गावर टाकली धानोरा पोलिसांनी धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा पोलिसांनी सोडे मार्गालगत शेतशिवारात मंगळवारी धाड टाकून येथून मोहफूल दारूसह ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी राकेश तुळशीराम तुलावी (२३) रा. काशिराम टोला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले आहेत. धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश साळुंखे, पोलीस उपनिरिक्षक हिंमतराव सरगर, सतिश अंडीलवार यांनी सोडे मार्गावरील शेतशिवारात धाड टाकली. येथे मोहफुलाची दारू गाळल्या जात होती. दरम्यान पोलिसांनी येथून २० लिटर मापाच्या व १० लिटर मातापच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली ३० लिटर मोहफूल दारू जप्त केली. मडक्यामध्ये ठेवलेला ४०० लिटर मोहफूल सडवा, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार मोठ्या जर्मन केतल्या. एक लाकडी काठी, दोन चाटू आदी साहित्य जप्त केले.
धानोरा पोलिसांच्या या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत आहे.

Web Title: The Mohawk darahah mahalam seized