आसरअल्लीतील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:52+5:302021-04-01T04:36:52+5:30
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा ...

आसरअल्लीतील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात. परंतु मागील एक महिन्यापासून येथील बीएसएनएल सेवा विस्कळीत होत आहे. विद्युत पुरवठाही खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु ही समस्या सोडविण्याकडे दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्राहकांकडून होत आहे. सातत्याने मागणी करूनही बीएसएनएलने या भागातील भ्रमणध्वनी व इंटरनेची सुविधा सुरळीत केली नाही. परिणामी नागरिकांना एकमेकाशी संपर्क साधण्याकरिता उंच ठिकाणी वारंवार जावे लागत आहे. कव्हरेज पकडत नसल्याची समस्या आहे.