आमदारांनी एमआयडीसीच्या जागेची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:16 IST2017-11-16T01:15:38+5:302017-11-16T01:16:29+5:30

आ. डॉ. देवराव होळी यांनी बुधवारी अहेरी व सिरोंचा येथे दौरा करून एमआयडीसीच्या प्रस्तावित व रिकामी पडून असलेल्या जागेची पाहणी केली.

 MLAs surveyed land for MIDC | आमदारांनी एमआयडीसीच्या जागेची केली पाहणी

आमदारांनी एमआयडीसीच्या जागेची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आ. डॉ. देवराव होळी यांनी बुधवारी अहेरी व सिरोंचा येथे दौरा करून एमआयडीसीच्या प्रस्तावित व रिकामी पडून असलेल्या जागेची पाहणी केली. यावेळी अहेरीचे उपविभागीय अधिकारी सचिन ओंबासे, तहसीलदार प्रशांत गरूडे, भाजपचे अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, डॉ. शिवा कुमरे, सतीश मुक्कावार आदी उपस्थित होते. ‘मेक इन गडचिरोली’ अंतर्गत १०० दिवसात १०० उद्योग उभारण्याचा आ. डॉ. होळी यांचा मानस आहे. याअनुषंगाने अहेरी व सिरोंचा येथील एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांनी यासंदर्भात चर्चा केली. अहेरी व सिरोंचा येथे उद्योग उभारणीसंदर्भात अनुकूल असलेल्या बाबींची त्यांनी चाचपणी केली. यावेळी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Web Title:  MLAs surveyed land for MIDC