आलापल्लीत क्रीडा सुविधांचा आमदारांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:22+5:30

आलापल्ली येथील क्रीडा संकूल भवनात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, पराग पांढरे, लक्ष्मण येर्रावार, वासुदेव पेद्दिवार, कैलास कोरेत, आशिष झाडे आदी उपस्थित होते.

MLAs review sports facilities in Alapalli | आलापल्लीत क्रीडा सुविधांचा आमदारांनी घेतला आढावा

आलापल्लीत क्रीडा सुविधांचा आमदारांनी घेतला आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात असलेल्या क्रीडा सुविधांचा आढावा घेतला. तसेच क्रीडा सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी सुध्दा क्रीडा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या.
आलापल्ली येथील क्रीडा संकूल भवनात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, पराग पांढरे, लक्ष्मण येर्रावार, वासुदेव पेद्दिवार, कैलास कोरेत, आशिष झाडे आदी उपस्थित होते.
अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणारी गावे आदिवासीबहुल आहेत. या गावांमधील विद्यार्थी शरीराने अतिशय काटक आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. मात्र सोयीसुविधा व योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने पुढच्या पातळीपर्यंत पोहोचणे कठीण होते. या युवकांना सुविधा पुरविल्यास सदर विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारू शकतात. ही बाब लक्षात घेऊन त्यांना सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे आ.आत्राम म्हणाले.

प्रस्ताव तयार करा
अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुकास्थळी तसेच ग्रामीण भागात ज्या क्रीडा सुविधा आवश्यक आहेत, त्यांचे प्रस्ताव तयार करून पाठवा. सदर प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी आपली आहे, असे निर्देश धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

Web Title: MLAs review sports facilities in Alapalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार