बेपत्ता मुली सापडल्या; तिघांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 6, 2017 01:41 IST2017-01-06T01:41:05+5:302017-01-06T01:41:05+5:30

संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील दोन्ही विद्यार्थिनी अखेर सापडल्या आहेत.

Missing girls found; Filed three trials | बेपत्ता मुली सापडल्या; तिघांवर गुन्हा दाखल

बेपत्ता मुली सापडल्या; तिघांवर गुन्हा दाखल

कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनी
एटापल्ली : संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील दोन्ही विद्यार्थिनी अखेर सापडल्या आहेत. या दोन्ही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून काही युवकांनी पळवून नेले होते. पोलिसांनी पळवून नेणाऱ्या युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१० दिवसांपूर्वी एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात नवव्या वर्गात शिकत असलेल्या दोन अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींना पळवून नेणाऱ्या नरेश यादव कुमरे (२३) रा. आलापल्ली, संतोष जितू कस्तुरे (१९) रा. नागुलवाडी व एका अल्पवयीन मुलीच्या विरोधात एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये ३६३, ३६६, ३७६, बाल लैंगिक अत्याचार कलम ४, ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एटापल्लीचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे, महेश पाटील यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तपासादरम्यान सदर मुली आलापल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुलींची सुटका केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Missing girls found; Filed three trials