नक्षल बॅनर लावताना एका सदस्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:41 IST2021-09-21T04:41:05+5:302021-09-21T04:41:05+5:30
२१ सप्टेंबर रोजी नक्षलवाद्यांचा विलय दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी जिल्ह्यातील विविध भागात हिंसक कारवाया करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

नक्षल बॅनर लावताना एका सदस्याला पकडले
२१ सप्टेंबर रोजी नक्षलवाद्यांचा विलय दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी जिल्ह्यातील विविध भागात हिंसक कारवाया करण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिदुर्गम गावांमध्ये नक्षलवाद्यांचे स्थानिक संघटन जनमिलिशिया कार्यरत आहे. लालसू मट्टामी हा त्याचा सदस्य आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलीस दलाकडून त्याला नक्षलवाद्यांना मदत न करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. तरीही तो पोलिसांचे न ऐकता नक्षलवाद्यांना मदत करीत होता. सोमवार, दि. २० रोजी विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी तो नक्षल बॅनर लावताना आढळून आला. त्याच्याकडून नक्षल बॅनर व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, कोठीचे प्रभारी अधिकारी महेश घुगे यांच्या पथकांनी केली. नक्षलवाद्यांच्या विलय दिन सप्ताहाला कोणतेही सहकार्य न करता जोरदार निषेध करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.