बिहीटेकलात मुख्याध्यापकांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST2021-07-07T04:45:50+5:302021-07-07T04:45:50+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरची पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम हाेते. उद्घाटक म्हणून बोटेकसा केंद्राचे केंद्रप्रमुख पुरुषोत्तम चापले हाेते. प्रमुख ...

Meeting of Headmasters at Bihitekala | बिहीटेकलात मुख्याध्यापकांची सभा

बिहीटेकलात मुख्याध्यापकांची सभा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरची पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम हाेते. उद्घाटक म्हणून बोटेकसा केंद्राचे केंद्रप्रमुख पुरुषोत्तम चापले हाेते. प्रमुख अतिथी म्हणून भगवंतराव हायस्कूल बोटेकसाचे मुख्याध्यापक नामदेव नागापुरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ओमराम टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक नामदेव नागपुरे यांनी संच मान्यता व शिक्षण शेती उपक्रम यावर प्रकाश टाकला. तर पुरुषोत्तम चापले यांनी पंचेचाळीस दिवसाचा ब्रिज कोर्स राबविण्याबाबत मुलांचे आधार कार्ड अपडेट, संच मान्यता व इतर विषयावर मार्गदर्शन केले. तर गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम यांनी शिक्षण विषयक धोरणांवर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार फाल्गुन कुळे यांनी केले.

Web Title: Meeting of Headmasters at Bihitekala