बंजारा समाजाचा मेळावा उत्साहात
By Admin | Updated: January 26, 2017 02:11 IST2017-01-26T02:11:06+5:302017-01-26T02:11:06+5:30
बंजारा समाजाच्या वतीने शहरात स्नेहमिलन मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात

बंजारा समाजाचा मेळावा उत्साहात
गडचिरोली : बंजारा समाजाच्या वतीने शहरात स्नेहमिलन मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात विविध स्पर्धा घेऊन यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वाशिम येथील प्रमिला आडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शशिकला राठोड, सुलोचना आडे, ललीता राठोड, रविता लावडे उपस्थित होत्या. मेळाव्यात संगीत खुर्ची वन मिनीट गेम घेण्यात आला. मुलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक चेतन विनय चव्हाण, द्वितीय क्रमांक वैैष्णवी पवार, वन मिनीट गेममध्ये प्रथम क्रमांक प्रज्ज्वल गुगलोत, द्वितीय क्रमांक चेतन चव्हाण यांनी पटकाविला. महिलांच्या संंगीत खुर्चीमध्ये प्रथम प्रीती पवार, द्वितीय क्रमांक जयश्री पवार, वन मिनीट गेम मध्ये प्रथम प्रीती पवार, द्वितीय क्रमांक सामका राठोड यांनी पटकाविला. समाजाने आपली संस्कृती जोपासत आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन प्रमिला राठोड यांनी केले. तर महिलांनी कौंटुबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन प्रा. संतोष आडे यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विकास चव्हाण, सचिव वसंत पवार, प्राचार्य चव्हाण यांचा बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विकास चव्हाण, संचालन प्रा. विजया चव्हाण तर आभार किशोर चव्हाण यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)