शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

'मावा इदु मंदाना जागा'; जेव्हा पोलिस ठाणे बनते हक्काचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 11:18 AM

Gadchiroli News मावा इदु मंदाना जागा माडिया भाषेतील हे वाक्य आहे माली घासी उसेंडी यांचे. मराठीमधून याचा सरळ सरळ अर्थ पोलीस स्टेशन लाहेरी हे आमच्यासाठी हक्काचे आश्रयस्थान आहे.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातल्या लाहेरीचे पोलिस ठाणे आहे आदिवासींचे हक्काचे स्थान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: मावा इदु मंदाना जागा माडिया भाषेतील हे वाक्य आहे माली घासी उसेंडी यांचे. मराठीमधून याचा सरळ सरळ अर्थ पोलीस स्टेशन लाहेरी हे आमच्यासाठी हक्काचे आश्रयस्थान आहे. अलंकाराचा अभाव असलेले हे वाक्य एक आदिवासी महिलेचा गडचिरोली पोलीस दलाबद्दल असलेल्या विश्वास आणि कृतज्ञतेने संपूर्ण अलंकृत झाले आहे.लाहेरी हे आजूबाजूच्या दुर्गम भागात पस्तीस असलेल्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे 1 ली ते 12 वि पर्यंत निवासी आश्रमशाळा, स्वस्त धान्य दुकान, तलाठी मुख्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्टॉप आणि छोट्या मोठ्या किराणा व जीवनोपयोगी वस्तू मिळण्याचे एकमेव ठीकाण आहे. यातच लाहेरी पोलिसांचे पाठपुराव्याने महाराष्ट्र बँकेची अल्ट्रा स्मॉल ब्रँच काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. त्यामुळे विविध कामांसाठी दूरवरून अगदी 30 ते 40 किमी ची पायपीट करत नागरिक समूहाने येतात.

मुक्काम करण्यासाठी ते आपापसात छोटे गट बनवून येथील ओळखीच्या आपल्या गरिब बांधवांकडे मुक्काम करतात. परंतु इथेच सर्व थांबत नाही. पुढचा प्रश्न असतो तो जेवणाचा. आधीच हलाखीचे जीवन जगत असलेले लाहेरीचे आदिवासी बांधव इच्छा असतानाही जेवणाची सोय करण्यात किती पुरे पडणार! मग अशावेळी हक्काचा एकच पर्याय उरतो तो म्हणजे उप पोलीस स्टेशन लाहेरी.

दि 29/11/2020 सकाळी 7.00 वा लाहेरीपासून 25 किमी दूर असलेल्या फोदेवाडा येथून सुमारे 60 नागरिक, ज्यामध्ये महिला, पुरुष आबालवृद्ध सर्व होते. त्यातच वयाची 50 ओलांडलेल्या माली घासी उसेंडी देखील होत्या, पायी चालत लाहेरीत आले. दिवसभरात कामे उरकून घेतली. संध्याकाळी 6.00 वाजले. जेवणाची सोय काय? अशावेळी सर्वांनी उप पोलीस स्टेशन गाठले.सर्वांना पुरेल इतका शिधा पोलीस स्टेशन कडून पुरवण्यात आला व दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी निमंत्रण ही मिळाले.दुसरे दिवशी सकाळी 8.00 वा सर्वांनी उपस्थिती लावली. यंदाची दिवाळी आदिवासी बांधवासोबत या संकल्पनेनुसार सर्वांना कपड्याचे वाटप करून नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर परतताना जेवणाची सोय म्हणून शिधा देखील पुरवण्यात आला. त्यावेळी निरोप घेतानाचे हे उद्गार मालीबाई यांचे तोडून सहजच निघाले व सर्व काही सांगून गेले. यावेळी प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी भेट दिलेल्या नागरिकांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक