‘मावा गडचिरोली’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:01 IST2018-06-10T00:01:00+5:302018-06-10T00:01:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ ....

‘मावा गडचिरोली’ उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील ११५ जिल्ह्यांना महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये परावर्तित करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशीम व गडचिरोली या चार जिल्ह्यांची निवड झाली आहे म्हणूनच आपल्या जिल्ह्याला महत्वकांक्षी जिल्हा बनविण्यासाठी ‘मावा गडचिरोली’ उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील विचारवंतांच्या कल्पना विचार व मार्गदर्शन घेऊन जिल्ह्याचा विकास घडवून आणू असा विश्वास आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीत झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री अम्ब्रीरश आत्राम यांनी व्यक्त केला.
पुढे माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्य, पोषण, कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. २० ते २३ जून या कालावधीत योजनांचा शुभारंभ केला जाईल. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी नागेपल्ली येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा येथील सरपंच, सदस्य, अधिकारी हजर होते.
विकासाच्या मुद्यांवर सूचना देणाऱ्यास पारितोषिक
मावा गडचिरोली या उपक्रमाअंतर्गत ११ प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहेत. ११ प्रश्नांवर सर्वोत्कृष्ट सूचना, कल्पना व विचार सुचविणाºया व्यक्तीला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. समाजातील कुर्मा घरप्रथा बंद करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, बाळंतपणातील सुतकप्रथा दूर करण्यासाठी उपाययोजना, अंगणवाडीच्या माध्यमातून बालक व गर्भवती तसेच स्तनदा माता यांना चौरस आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहारात काही बदल करावे, असे आपणास वाटते काय? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी पुरक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते कोणते बदल करावेत, परसबागेत शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी काय करायला हवे, धानाची उत्पादकता वाढविणे, साठवणूक, मूल्यवर्धन, ब्रँडींग होण्यासाठी काय अपेक्षित आहे. वनोपज संकलनातून रोजगार निर्मितीस चालना देऊन आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न व्हावयास हवे, याबाबत सूचना सूचविणाºयास पारितोषिक दिले जाणार आहे.