शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे

By संजय तिपाले | Updated: December 8, 2025 13:28 IST

Gadchiroli News: दोन दशकांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेला एमएमसी झोनचा (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड) कणा व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामधेर मज्जी याने ८ डिसेंबर रोजी पहाटे छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बकरकट्टा पोलिस ठाण्यात ११ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले.   

गडचिरोली - दोन दशकांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेला एमएमसी झोनचा (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड) कणा व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामधेर मज्जी याने ८ डिसेंबर रोजी पहाटे छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बकरकट्टा पोलिस ठाण्यात ११ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले.

रामधेर याने स्वतःची एके–४७, तर त्याच्या सहकाऱ्यांनी इन्सास, एसएलआर .३०३ रायफल्स, आयईडी यांसारखी शस्त्रे सुरक्षा दलांच्या ताब्यात दिली. गडचिरोली–गोंदिया–बालाघाट–उत्तर बस्तर या सर्व पट्ट्यात दशकानुदशके सक्रिय असलेली त्याची युनिट ही दक्षिणी एमएमसी झोनची शेवटची फळी मानली जात होती. ११ दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात एमएमसी झोनचा प्रवक्ता अनंत उर्फ विकास नागापुरे याने ११ माओवाद्यांसह शरणागती पत्करली होती. नागापुरे हा संघटनेची निवेदने, प्रचार आणि तांत्रिक समन्वय पाहणारा प्रमुख ‘मिडिया लिंक’ मानला जात होता.  अनंतने शरण येताना आपल्या सहकाऱ्यांना  रामधेरशी संपर्क वाढवा, त्यालाही बाहेर आणा, अशी जबाबदारी दिली होती. ठरल्याप्रमाणे काही दिवसांतच रामधेरचा गट पूर्णतः चळवळीतून बाहेर पडला आणि ८ डिसेंबरला पहाटे त्यांनी शस्त्रे खाली ठेवली.

एमएमसी झोनचा संपूर्ण पाडाव, एकाच आठवड्यात तीन मोठी समर्पणेरविवारीच मध्यप्रदेशातील बालाघाट–मंडला पट्ट्यात केबी डिव्हिजनचे २ कोटी ३६ लाख इनाम असलेले १० माओवादी शरण आले होते. कान्हा–बांधवगड जंगलपट्ट्यात सक्रिय असलेल्या या गटामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड पोलिसांना सतत आव्हान होते. त्या आधी—गोंदियात अनंत नागापुरेचे समर्पण आणि आता रामधेरसह ११ जणांची शरणागती यामुळे एमएमसी झोनचे तीनही स्तर एकाच महिन्यात कोसळले. माओवादी चळवळीच्या अस्ताच्या प्रवासातील ही अतिशय महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

मिलिंद तेलतुंबडेनंतर होती रामधेरवर जबाबदारीमाओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याच्या निधनानंतर रामधेर मज्जी याने एमएमसी झोनची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली होती. तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादी चळवळ रुजविण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती, अनेक हिंसक कारवायांमध्ये तो सहभागी होता. अखेर त्याने चळवळीतील प्रवासाला पूर्णविराम देत शस्त्र टाकून संविधानाचा मार्ग स्वीकारला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Top Maoist Ramdher surrenders with aides, big blow to MMC.

Web Summary : Maoist leader Ramdher Majji, carrying a ₹3 crore bounty, surrendered in Chhattisgarh with 11 associates, delivering a blow to the MMC zone. They surrendered weapons, including AK-47s and rifles. This follows another surrender, signaling the collapse of the MMC zone after the death of Milind Teltumbde.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्रChhattisgarhछत्तीसगड