शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अनेक तेंदू कंत्राटदारांचा पैसा खंडणीच्या रुपात नक्षलवाद्यांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 13:03 IST

तेलगू कंत्राटदारासोबतच महाराष्ट्रातील काही तेंदू कंत्राटदारांचे नक्षलवाद्यांसोबत आर्थिक संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देधागेदोरे गवसण्याची शक्यता तेलंगणातील ‘तो’ कंत्राटदार फरार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे तेंदूपत्ता तोडाईचे कंत्राट घेणाऱ्या अनेक कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांना खंडणीच्या रूपात पैसा पुरविला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात तेलंगणातील एका कंत्राटदाराकडून नक्षल्यांसाठी जाणारी १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी पकडल्यानंतर याबाबतचे धागेदोरे गवसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२ जून रोजी तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या दोन वाहनांमधील २ कोटी २० लाख रुपयांपैकी एका वाहनातील १ कोटी २० लाख रुपये नक्षलवाद्यांना देण्यासाठी जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राज्याच्या सीमेवर एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून ती रक्कम सिरोंचा पोलिसांनी जप्त केली होती. दरम्यान त्या वाहनातील कंत्राटदाराचा व्यवस्थापक संजय अवथळे (रा.आष्टी) याला पोलिसांनी अटक केली तर तेलंगणाच्या वारंगल येथील दोन तेंदूपत्ता कंत्राटदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ते कंत्राटदार सध्या फरार आहेत. मात्र अटकेत असलेल्या व्यवस्थापकाचा १० दिवसांचा पीसीआर मिळवण्यात पोलिसांना यश आल्यामुळे त्याच्याकडून या व्यवहाराची बरीच माहिती हाती लागणार आहे.विशेष म्हणजे या प्रकरणातील तेलगू कंत्राटदारासोबतच महाराष्ट्रातील काही तेंदू कंत्राटदारांचेही अशाच पद्धतीने नक्षलवाद्यांसोबत आर्थिक संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा तपास पुढे सरकताना इतर काही कंत्राटदारांची नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तपास अहेरी एसडीपीओंकडेदरम्यान तेंदूपत्ता ठेकेदार आणि नक्षलवाद्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणाºया या महत्वपूर्ण प्रकरणाचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे. अटकेत असलेल्या एका आरोपीकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासोबतच तेलंगणातील फरार कंत्राटदाराला अटक करणे आणि नक्षलवाद्यांच्या कोणत्या दलमकडे पैशाची रसद जाणार होती त्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी